![]() ![]() अकलूज (जि. सोलापूर) - संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील भव्य गोल रिंगण सोहळा सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पार पडला. (सर्व छायाचित्रे - गणेश जामदार, अकलूज) |
||
![]() पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर अश्वाचे पूजन करताना विजयसिंह मोहिते पाटील ![]() सोहळ्यात अश्वपूजनप्रसंगी विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, सौ. सुलक्षणादेवी मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील ![]() पादुकांचे दर्शन घेताना विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार हनुमंतराव डोळस ![]() भक्तीरसात दंग होऊन भजन करताना पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जयसिंह मोहिते पाटील आणि वारकरी समुदाय ![]() पालखी सोहळ्यात बंदोबस्ताचा ताण विसरून टाळ मृदुंग आणि तुतारीच्या तालावर नाचण्याचा आनंद घेताना पोलिस |
पंढरपुरात ध्वनिप्रदूषण टाळावे
प्रदक्षिणा मार्गावर कॅसेटच्या दुकानांमुळे त्रास विलास
उत्पात - सकाळ वृत्तसेवा पंढरपूर - नगरप्रदक्षिणा मार्गावर कॅसेट,
सीडीच्या दुकानासमोर लोक टीव्ही बघण्यासाठी उभे राहतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा
तर होतोच परंतु मोठ्या प्रमाणातील ध्वनिप्रदूषणामुळे दिंडीत भजन करणाऱ्यांना अडथळा
येतो. हे लक्षात घेऊन संबंधित व्यापाऱ्यांनी आवाज मर्यादित ठेवावा. महाद्वार,
तुकाराम मंदिर, बेलीचा महादेव, काळा मारुती, मंडई, चौफाळा, नाथचौक, उद्धव घाट व
दत्त घाट येथे नगरप्रदक्षिणा करणाऱ्या दिंड्या विशिष्ट अभंग गात असतात. त्याठिकाणी
तरी या व्यापाऱ्यांनी ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रशासनाने
संबंधितांना योग्य समज दिली पाहिजे, अशी अपेक्षा मंदिर समितीचे माजी अध्यक्ष व
वासकर फडाचे प्रमुख विवेकानंद महाराज वासकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त
केली. श्री. वासकर महाराज म्हणाले, "पंढरपुरात मोक्याच्या जागी उदाहरणार्थ कालिकादेवी मंदिर, भजनदास चौक आदी ठिकाणी क्लोजसर्किट कॅमेरे लावून रहदारीचे नियंत्रण करावे. नगरप्रदक्षिणा मार्गावर वाहने, हातगाडी, फेरीवाले व दुकानांचे अतिक्रमण असू नये. चौफाळा ते महाद्वार, मुक्ताबाई चौक येथे नेहमी अतिक्रमण आढळून येते. महाद्वार चौकात वाहने येण्यास प्रतिबंध करावा.'' "या हरिभक्तांची वाळवंट
जागरणासाठी दिले,'' असा उल्लेख जगद्गुरू तुकोबारायांनी त्यांच्या अभंगात केला, असे
सांगून वासकर महाराज म्हणाले, की चंद्रभागेचे वाळवंट हे वारकऱ्यांना
भजन-कीर्तनासाठी उपलब्ध झाले पाहिजे. पंढरपूरचा विकास करताना तो पर्यटन केंद्र
म्हणून न करता वारकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक गोष्टीवर भर द्यावा, अशी अपेक्षा
व्यक्त केली. चंद्रभागेचे शुद्धीकरण आणि पाणी वाहते राहणे आवश्यक आहे. वाळवंटात
उपाहारगृह आणि वाहनांचे अतिक्रमण होऊ नये. सर्व उपाहारगृहे दोन घाटांच्या मधल्या
भागात ओळीने उभारली तर ते सर्वांच्या सोयीचे होईल. वारकऱ्यांनी वर्षभरात एकाला
व्यसन मुक्त करण्याची शपथ पांडुरंगाच्या पायापाशी घ्यावी. पालकमंत्री लक्ष्मणराव
ढोबळे यांनी सात दिवस पंढरपुरातील मद्य विक्री बंद ठेवण्याचे जाहीर केले होते.
परंतु, तसे घडले नाही. वारी संपेपर्यंत मद्य विक्री पंढरपुरात होऊ नये अशी आमची
अपेक्षा आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी २२ तास रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना
चिखलात उभे राहावे लागू नये, अशी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा तुकोबारायांचे वंशज
बाळासाहेब महाराज देहूकर यांनी व्यक्त केली. वारकऱ्यांच्या दृष्टीने स्वच्छ
वाळवंट, विठ्ठल रुक्मिणीचे सुलभ दर्शन आणि विना अडथळा नगरप्रदक्षिणा या तीन
गोष्टीला महत्त्व आहे. दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना पावसापासून निवारा
मिळण्यासाठी डोक्यावर आच्छादन असणे जेवढे आवश्यक असते, तेवढेच पंढरपुराबाहेर पाच
किलोमीटर बाहेर गेलेल्या रांगेत उभे असणारे भाविक जेथे उभे असतात तेथे पाऊस
पडल्यानंतर चिखल होणार नाही अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. तातडीने क्रॉंक्रिटीकरण
अथवा डांबरीकरण शक्य नाही. निदान मुरुम तरी टाकावा. दर्शन रांगेत उभे असलेल्या
भाविकांसाठी प्रथमोपचार करणारे फिरते पथक असावे. पथदिव्याची पुरेशी व्यवस्था असावी,
अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वारकरी फडकरी संघटनेचे खजिनदार भागवत
महाराज चवरे यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाच्या योजनांची अंमलबजावणी चांगल्या
प्रकारे व्हावी. पौर्णिमेपर्यंत स्वच्छ पाणी, वाळवंटातील स्वच्छता राहणे आवश्यक
आहे. पंढरपूर शहरात यात्रेच्या काळात भारनियमन होत नाही. त्याचप्रमाणे चार महिने
चातुर्मासात भारनियमन होऊ नये. संडास, स्वच्छतागृहाची व्यवस्था ठिकठिकाणी मोठ्या
प्रमाणात असावी. त्या ठिकाणी पाण्याची भरपूर व्यवस्था असावी. रॉकेल, गॅस त्याचा
पुरवठा वारकऱ्यांसाठी केला जावा. पायी दिंडीबरोबर येणारी वाहने मठापर्यंत नेण्याची
सोय केली जावी. कारण या वाहनामध्ये आळंदी-पंढरपूर चालत येणाऱ्या वारकऱ्यांचे
सर्वसाहित्य असते. ते मठापर्यंत पोचले जाणे आवश्यक आहे. पंढरपूर येथील कर्मवीर
भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या पुढे दिंडीतील वाहने जाण्यास प्रतिबंध केला जातो.
तसा तो केला जाऊ नये, ही अपेक्षा श्री.चवरे महाराज यांनी व्यक्त केली. ![]() पादुकांचे दर्शन घेताना जयसिंह मोहिते पाटील आणि सौ. सुलक्षणादेवी मोहिते पाटील ![]() तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेताना खासदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि आमदार हनुमंतराव डोळस ![]() सोहळ्याच्या आगमनापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे रिंगण मैदानावर चिखल झाला होता. परंतु वारकऱ्यांनी चिखलात खेळ खेळून आपला आनंद असा व्यक्त केला ![]() संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगणात डोक्यावर तुळस घेऊन धावणाऱ्या महिला वारकरी |
|










