गराडे - महाराष्ट्र केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशन व सासवड मेडिकल असोसिएशनच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ एक लाख रुपयांच्या बामचे वाटप सासवड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे यांचे हस्ते करण्यात आले.

सासवड (ता. पुरंदर) येथून आज (२९ जून) सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीने आषाढीवारीसाठी मार्गस्थ झाली. या वेळी अमर बामचे वाटप करण्यात आले. सी.ए.पी.चे अध्यक्ष माउली नरहर व सचिव विजय चंगेरिया यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन दर वर्षी एखादा उपक्रम राबवीत असते, अशी माहिती बाळासाहेब भिंताडे यांनी दिली.

या वेळी असोसिएशन उपाध्यक्ष संतोष ढवाळ, सचिव संतोष कुंभार, सहसचिव सोमनाथ मायदेव, खजिनदार नीलेश डाकले, अमोल देशपांडे, जितेंद्र गांधी आदी उपस्थित होते.