संत तुकाराम महाराज पालखीला भक्तिपूर्ण निरोप
Posted by सकाळ वृत्तसेवा on Saturday, June 25, 2011
Under: News
पिंपरी, ता. 25 ः जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी
सोहळ्याने उद्योगनगरीतील भाविकांचा दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन
ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात पालखी सोहळा शनिवारी (ता. २५) दुपारी पुण्याकडे
मार्गस्थ झाला. पालखीने शहरातील मुक्काम आटोपून दुपारी अडीचच्या सुमारास मुळा नदी
ओलांडून पुणे शहराच्या हद्दीत प्रवेश केला. लाखो वैष्णवांसह निघालेल्या तुकोबांच्या
पालखी सोहळ्याला शहरवासीयांनी दापोडी येथे मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला.
संत तुकारामनगर येथे पालखीचा मुक्काम होता. तेथे पहाटे साडेपाच वाजता विश्वस्तांच्या हस्ते काकड आरती झाली. तसेच, संत तुकाराम प्रतिष्ठानच्या वतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी नऊ वाजता पालखी मार्गस्थ झाली. पालखीच्या मागे आणि पुढे दिंड्या होत्या. पुणे-मुंबई महामार्गावर वाटेत भाविकांनी दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. पालखीबरोबर चालणारे आणि दर्शनासाठी थांबलेले भाविक ज्ञानोबा-तुकारामांच्या नामघोषात धुंद झाले होते. दरवर्षी कासारवाडी येथे पालखी काही काळ विसावा घेते. मात्र, यंदा दापोडी येथे पालखीने विसावा घेतला. वल्लभनगर, कासारवाडी, फुगेवाडी येथे भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. महिलांनी ठिकठिकाणी पालखीला औक्षण केले; तर अनेक ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव केला. महामार्गावरील अल्फा लावल, ऍटलास कॉप्को, मार्शल, सॅण्डवीक एशिया यांसह इतर लहान-मोठ्या कंपन्यांच्या वतीने तुकोबांच्या पालखीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. तसेच, वारकऱ्यांना खाद्यपदार्थांचे वाटप केले. ज्ञानराज विद्यालयातर्फे वारकऱ्यांना एक हजार लाडू आणि भाकरी-पिठलं वाटप करण्यात आले. भक्तिमय वातावरणात दुपारी सव्वा वाजता दापोडी येथील हॅरिस ब्रिजजवळ पालखीचे आगमन झाले.
नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेवक राजेंद्र काटे तसेच स्थानिक मित्रमंडळांनी पालखीचे स्वागत केले. पालखी येण्याच्या तीन तास आधीच परिसरातील हजारो भाविक विसाव्याच्या ठिकाणी दर्शनासाठी रांगेत उभे होते. तुकोबांच्या पादुका पालखीतून काढून विसाव्याच्या ठिकाणी ठेवण्यात आले. सुमारे दोन तास येथे पालखीने दुपारचा विसावा घेतला. भाविकांनी पादुकांचे दर्शन घेऊन पालखीला भावपूर्ण निरोप दिला. दर्शनाची रांग संपल्यानंतर पोलिसांनी स्वतः वारकरी होऊन दुपारी अडीचच्या सुमारास पालखी खांद्यावर घेत विविध फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात ठेवली आणि पालखीची मुळा नदी ओलांडून पुण्याकडे वाटचाल सुरू झाली.

In : News