येरवडा - पालखी मार्गावर संगमवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने रस्त्याची सफाई, स्वच्छता करण्यात आली आहे. परिसरातील राडारोडाही उचलण्यात आला आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. माया लोहार यांनी दिली.

डॉ. लोहार म्हणाल्या, ""संगमवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सहा ते सात किलोमीटरचा पालखी मार्ग आहे. या मार्गावर 13 कचरापेट्या ठिकठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. अतिक्रमण विभागामार्फत खाद्यपदार्थ उघडे ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिका मिळकतकर संकलन विभाग केंद्रामध्ये प्राथमिक उपचार केंद्राची सोय आहे. पालखी मार्गावर कीटक औषध फवारणी करण्यात आली आहे. माउलींच्या दर्शनासाठी चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून रेलिंगची सोय करण्यात आली आहे.''