पिंपरी - निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ द्वारा संस्कृती संवर्धन व विकास महासंघातर्फे गुरुवारी पालखी सोहळ्यात सहभागी दिंड्यांना शिधावाटप करण्यात येणार आहे.

यामध्ये तांदूळ व मूगडाळीचा समावेश असून, प्राधिकरणात 25 ठिकाणी महासंघाचे कार्यकर्ते थांबणार आहेत. या उपक्रमात शहरातील 35 संस्था सहभागी झाल्या असल्याचे स्वयंसेवक रविकांत कळंबकर यांनी कळविले आहे.