लोणी काळभोरला वैष्णवांचे जोरदार स्वागत
Posted by जनार्दन दांडगे, सकाळ वृत्तसेवा on Monday, June 27, 2011
Under: News
तुकाराम महाराजांच्या पादुका
दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
लोणी काळभोर - अंगावर पावसाच्या धारा झेलत ज्ञानोबा-तुकोबारायांच्या जयघोषात विठ्ठल - रुक्मिणीच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वैष्णवांसह जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीने सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर गावात प्रवेश केला. पुणे - सोलापूर महामार्गावर कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश करताच, सरपंच शालन राऊत यांच्याबरोबरच लोणी काळभोर व कदमवाक वस्ती या दोन्ही गावातील प्रमुख ग्रामस्थांसह संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालेल्या हजारो भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने टोलनाक्यावर वैष्णावांचे स्वागत केले.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब कोतवाल, राष्ट्रवादी औद्योगिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुनील शितोळे, उपसरपंच सुनील कदम, माजी उपसरपंच देविदास कदम, उद्योजक विजय हरपळे, पुणे जिल्हा वाळू वाहतूक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष युवराज काळभोर आदींनी पालखीचे स्वागत केले. यावेळी सुनील शितोळे व बाळासाहेब कोतवाल यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचे प्रमुख संभाजीराव मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवीण काळभोर, बाबासाहेब काळभोर, ज्ञानेश्वर काळभोर, शेखर काळभोर, जयसिंग घाडगे, रुक्मिणी चांदणे आदी उपस्थित होते. सुनील शितोळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने वारकऱ्यांना गुडदाणीचे वाटप करण्यात आले. तर कवडीपाट येथील विनायक प्रतिष्ठानच्या वतीने फराळ्याच्या पदार्थांचे तर छावा ग्रुपच्या वतीने साबणाचे वाटप करण्यात आले.
पालखी सोहळा वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर येताच साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष नरसिंग काळभोर, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब काळभोर, युवा नेते सुजित काळभोर आदींनी पालखीचे स्वागत केले. तर कदमवाक वस्ती येथे जय हनुमान ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांना उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अशोक कदम व त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्यानंतर पालखी सात वाजण्याच्या सुमारास छोट्याशा विसाव्यासाठी लोणी स्टेशन येथे पोचली. त्या ठिकाणी पालखीचे स्वागत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सहसचिव नंदकुमार काळभोर, माजी सरपंच बेबीताई काळभोर, लोणी काळभोर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष सचिन काळभोर, मराठा महासंघाचे राकेश काळभोर, जनता विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय काळभोर, डॉ. धनश्री दांडगे, डॉ. रतन काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. यावेळी लोणी स्टेशन परिसरातील हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर पालखी सोहळा लोणी काळभोर येथील मुक्कामासाठी रवाना झाला.
लोणी स्टेशन येथील विसावा संपवून पालखी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत पोचताच लोणी काळभोरचे सरपंच चंदर शेलार, उपसरपंच प्रशांत काळभोर, ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब काळभोर, ग्रामविकास अधिकारी एम. पी. चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. तर लोणी गावात पालखीचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष केशव बाबूराव काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अप्पासाहेब काळभोर, साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष काशिनाथ काळभोर, लोणी काळभोर विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळभोर, सदस्य प्रकाश उद्धवराव काळभोर, ग्रामपंचायत सदस्य अशोकराव सोनवणे, संजय वीरकर आदींनी केले. दरम्यानच्या काळात लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेच्या विध्यार्थीनीनी तुळस डोक्यावर घेऊन पालखीचे स्वागत केले. यावेळी विलास काळभोर यांच्या अध्यक्षतेखालील शिवशक्ती तरुण मित्र मंडळांच्या वतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. पालखी आठ वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरात पोचली.

In : News