माउलींच्या स्वागतासाठी वाल्हे सज्ज
Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 29, 2011
Under: News
पालखीचे आज आगमन, महर्षी वाल्मीकी दिंडीचा
सहभाग
सोमेश्वरनगर - वाल्हे येथे उद्या (ता. ३०) दुपारी महर्षी वाल्मीकी ऋषींच्या भेटीस संतश्रेष्ठ ज्ञानदेवांचा पालखी सोहळा येणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी वाल्ह्याच्या बारा वाड्यांतील ग्रामस्थ सज्ज झाले असून, वारकऱ्यांचे गुढ्या उभारून स्वागत होणार आहे. याच गावात पालखीचा गावप्रदक्षिणा सोहळा पार पडणार आहे.
वाल्हे गावात वाल्मीकी ऋषींची समाधी आहे. या प्राचीन गावात ज्ञानदेवांची पालखी दर वर्षी मुक्कामी असते. पालखी उद्या दुपारी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान वाल्हे गावात प्रवेश करणार आहे. ग्रामस्थ व पदाधिकारी त्यांचे स्वागत करणार असून, त्यानंतर पालखीचा ग्रामप्रदक्षिणा सोहळा पार पडणार आहे. ग्रामप्रदक्षिणेचा मान असणारे वाल्हे हे पुणे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. प्रदक्षिणेनंतर पालखी तळाकडे जाऊन विसावणार आहे. या ठिकाणी परिसरातील भाविकांसाठी दर्शनाची सोय केली आहे. वारकऱ्यांसाठी शाळा, विद्यालय, धर्मशाळा, मंदिरे, मोकळ्या इमारती निवासासाठी स्वच्छ करून ठेवल्या आहेत. महर्षी वाल्मीकी ऋषींच्या समाधीच्या दर्शनाची सोय केली गेली आहे. घरोघरी त्यांच्यासाठी भोजनाची सोय केली जाणार आहे.
प्रशासनाने गावापासून दोन किलोमीटर अंतरावर मोकळ्या पटांगणात पालखी तळ तयार केला आहे. प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांतून गावाला जिल्हा परिषदेकडून तेराव्या वित्त आयोगातून एक लाख रुपये पालखी सोहळा निधी प्राप्त झाल्याने ग्रामपंचायतीने समाधान व्यक्त केले आहे. गेल्या वर्षात एक रुपयाही निधी मिळाला नव्हता. यातून पालखी मुक्कामाच्या परिसरात धुरळणी केली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ३२ विहिरी आरक्षित करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाने हॉटेल, खाद्य पदार्थांचे गाडे, फळविक्रेते यांना सूचना दिल्या असून, आरोग्य सुविधांसाठी पथक तयार ठेवले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून आठ फिरती शौचालये उपलब्ध झाली असून, वीज वितरण कंपनीनेही पालखी तळासाठी खास दोन टॉवर उभे करून वीज पुरविली आहे.
रस्त्याच्या कडेनेही विजेची सोय केली आहे, अशी माहिती सरपंच दत्तात्रेय पवार यांनी दिली. जिल्हा बॅंकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे, सरपंच श्री. पवार, उपसरपंच समदास भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य अमोल खवले, पोपट पवार, चंद्रशेखर दुर्गाडे, अंकुश दुर्गाडे, प्रशांत दोशी आदी जबाबदार मंडळी समक्ष पाहणी करत आहेत. उद्या पालखीमध्ये वाल्हे गावाचा महर्षी वाल्मीकी नावाची दिंडी सहभागी होणार आहे. या दिंडीसाठी ग्रामस्थांनी आकर्षक रथ दिला आहे.

In : News