माउलींच्या पालखीच्या दर्शनासाठी गर्दी
Posted by सकाळ वृत्तसेवा on Saturday, June 25, 2011
Under: News
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दिंडीप्रमुखांना सतरंजी वाटप
दिघी - "आम्ही दैवाचे दैवाचे, दास विठुरायाचे' अशा अभंगामधून सावळ्या विठुरायाचे गोडवे गात पंढरीकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीतील भाविकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. दिघी मॅगझीन चौकात महापौर योगेश बहल यांनी सोहळ्याचे स्वागत केले. पिंपरी-चिंचवड परिसरातील भाविकांनी माउलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. चऱ्होली-दिघी परिसर वारकऱ्यांनी फुलून गेला होता.
आषाढी वारीसाठी निघालेला माउलींचा पालखी सोहळा सकाळी साडेआठच्या सुमारास चऱ्होलीत आल्यावर थोरल्या पादुका मंदिरात माउलींच्या पादुका आणण्यात आल्या. तेथे माउलींची आरती करण्यात आली. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर, नंदकुमार तापकीर, संभाजी तापकीर, शांताराम तापकीर आदी उपस्थित होते. आरतीनंतर पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला.
आळंदी-पुणे रस्त्यावरून जाणाऱ्या माउलींच्या पालखी सोहळ्यात सुरू असलेल्या हरिनामाच्या जयघोषामुळे अवघा परिसर दुमदुमून गेला होता. दिघी मॅगझीन चौकात पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने महापौर योगेश बहल यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. या वेळी सोहळ्यात सहभागी दिंडीप्रमुखांना पालिकेच्या वतीने सतरंजी भेट देण्यात आली. उपमहापौर डब्बू आसवानी, स्थायी समिती अध्यक्षा सुमन पवळे, विरोधी पक्षनेते हनुमंत भोसले, नगरसेवक श्रीरंग बारणे, घनश्याम खेडकर, संतोष लोंढे, नगरसेविका आशा लांडगे, शांता आल्हाट, सुनंदा फुगे, मीना पाटील, विजय फुगे, अमृत पऱ्हाड आदी उपस्थित होते.
दिघी, चहोली, भोसरी, मोशी परिसरातील रहिवाशांनी आळंदी-पुणे रस्त्यावर वारकऱ्यांना अन्नदान केले. चोविसावाडी, वडमुखवाडी, साईनगरीतील विविध सामाजिक संस्था, संघटना व मंडळांनी वारकऱ्यांना इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. संस्कार फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांची वैद्यकीय शुश्रूषा करण्यात आली. साईमंदिराच्या वतीने अन्नदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, आरपीआय या विविध राजकीय पक्षांच्या वतीने पालखीचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांना अन्नदान व फळवाटप करण्यात आले. त्यात युवकांचा पुढाकार लक्षणीय होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास माउलींचा पालखी सोहळा दिघीतून विश्रांतवाडीमार्गे पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला.
महापौर खेळले फुगडी

माउलींच्या पालखी सोहळ्यात वारकरी पोशाख घालून आलेल्या महापौर योगेश बहल, उपमहापौर डब्बू आसवानी; तसेच उपस्थित नगरसेवक-नगरसेविकांना टाळ-मृदंगाच्या ठेक्यात फुगडी खेळण्याचा मोह आवरता आला नाही.
In : News