Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 29, 2011
Under: News
कुरकुंभ -: मळद ( ता. दौंड )
मुक्कामी असलेली चौरंगनाथ महाराज पालखी सकाळी हरिनामाच्या गजरात मार्गस्थ झाली.
ग्रामस्थांनी पालखी काही अंतर खांद्यावरून नेली.
कुरकुंभ येथून दुपारी प्रस्थान
झालेल्या चौरंगनाथ महाराज पालखीचे मंगळवारी (ता. २८) सायंकाळी मळद मुक्कामी आगमन
झाले. यावेळी गावातील पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.
परिसरातील ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले. ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात
मुक्कामाचा ठिकाणी रात्रीही भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
रात्री हरिनामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. मंदिरामध्ये भाविकांसाठी
कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर भाविकांच्या रात्रीच्या
जेवणाची व्यवस्था गजानन दुधे यांनी केली होती. बुधवारी (ता. २९) पहाटे काकड आरतीचा
कार्यक्रम पार पडला. सकाळी पालखीचे रावणगावकडे प्रस्थान झाले. रावणगाव ग्रामस्थांनी
पालखीचे शिवेवरती स्वागत केले.
In : News