पालखीसोबतची वाहने पर्यायी मार्गाने नेणार
Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 22, 2011
Under: News
पुणे - संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत येणारी वाहने गर्दी टाळण्यासाठी शक्य तेथे पर्यायी रस्त्याने नेण्यात येणार आहेत. शहरात तीन ठिकाणी असा प्रयोग प्रथमच केला जात आहे. याशिवाय पालखी मार्गावरील अन्य वाहतूक कमीत कमी वेळ रोखली जाईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.
या दोन्ही पालख्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे व मार्गाने पुण्यात येत आहेत. संत तुकाराम महाराजांची पालखी २३ जूनला; तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी २५ जूनला पुणे शहरात प्रवेश करणार आहेत. त्यांचा प्रवेश ते पुण्यातील मुक्काम या मार्गावरील वाहतुकीचे पोलिसांनी नियोजन केले आहे. त्याबद्दल पांढरे यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्यांनी सांगितले, ""पालखीसोबत येणारी वाहने ही गर्दीस कारण ठरतात. त्यामुळे या वर्षीपासून ती अन्य मार्गाने वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीमधून निघाल्यानंतर लवकर निघालेली वाहने आळंदी रस्त्यानेच विश्रांतवाडीमधील विश्रांतीच्या ठिकाणापर्यंत येतील. मात्र पालखीनंतर निघालेली वाहने आळंदी, मरकळ, तुळापूर, फुलगाव, लोणीकंद, वाघोली, लोहगाव, येरवडा या मार्गे आणली जातील. त्यानंतर पुढे येताना पालखी खडकीकडे जाणार असली; तरी वाहने मात्र, इंदिरानगर, मरिआई गेट, साप्रस चौकी जंक्शन, चंद्रमा चौक, सादलबाबा दर्गा, नवीन पुलावरून पाटील इस्टेट मार्गे पुणे मुंबई-पुणे रस्त्यावर येतील. २७ जून रोजी पालख्या पुण्याबाहेर पडताना वानवडीपासून पुन्हा वाहने वेगळी केली जातील. भैरोबानाला चौक, लुल्लानगर, कोंढवा, बोपदेव घाट या मार्गे वाहने सासवडला जाऊन पुन्हा पालखीला मिळतील.''
इतर वाहनांच्या नियोजनाबद्दल त्यांनी सांगितले, की पालख्यांच्या मार्गावरील वाहतूक नेहमीप्रमाणेच बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, रस्ते बंद ठेवण्याची वेळ कमी करण्यात आली आहे. पालखी येण्यापूर्वी काही काळ आणि पालखी पुढे गेल्यावर लगेचच मागे रस्ता वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. यासाठी वाहनधारकांना पर्यायी रस्त्यांचीही माहिती देण्यात आली आहे. पालख्यांचा मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणीही वाहनांना बंदी करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजय पळसुले यांनी सांगितले, ""नियोजनाची अधिक माहिती आणि मार्गाचा नकाशा पोलिसांच्या संकेतस्थळावर आणि फेसबुकवरही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी २६१२३५२० किंवा २६२०८२२५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या नियोजनासाठी वाहनधारकांनी सहकार्य करावे.''

In : News