पालखीनिमित्त बस वाहतुकीत बदल
Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 22, 2011
Under: News
नागरिकांसाठी ता.२५ ते २७ या काळात पर्यायी व्यवस्था
पुणे - श्री संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पीएमपी बसच्या वाहतूक व्यवस्थेत आणि मार्गात बदल केले जाणार आहे. पालखीचे पुण्यातून होणाऱ्या प्रस्थानाच्या दिवशी सासवड, सोलापूर रस्त्यावरील बससेवेतही बदल होणार आहेत.
आषाढी पालखी सोहळा देहू आणि आळंदी येथून शनिवारी (ता.२५) पुण्यात दाखल होत आहे. दोन दिवस मुक्काम केल्यानंतर सोमवारी (ता.२७) हा सोहळा पुढे मार्गस्थ होणार आहे. या तीन दिवसांत पीएमपीच्या बस वाहतूक व्यवस्थेतील बदल, पर्यायी व्यवस्था, जादा बसची व्यवस्था करण्यासंदर्भात प्रशासनाने सर्व आगारप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. वाहतूक नियोजनासाठी अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहे. आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर जात असतात. त्यांच्या सोयीसाठी महापालिका भवन, पुणे स्टेशन, स्वारगेट, हडपसर येथून जादा बस सोडण्यात येतील. या बस "आळंदी म्हस्केवस्ती'पर्यंत जातील.
पालखी आगमनाच्या दिवशी सकाळी पुणे - मुंबई रस्ता, पुणे- आळंदी रस्ता वाहतुकीसाठी अंशतः बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरील बस पर्यायी मार्गाने वळविण्यात येतील. रस्ता वाहतुकीस जसजसा मोकळा होईल त्याप्रमाणे वाहतूक सुरू केली जाईल. खडकी येथून सोडण्यात येणाऱ्या बस दुपारी दोनपर्यंत शांतीनगर कॉर्नरपर्यंत जातील. महापालिका भवन येथील क्रमांक १९१ ही बससेवा जुना बाजार, गाडीतळ, पुणे स्टेशन, महात्मा गांधी रस्ता मार्गाने वळविण्यात आली आहे. होळकर पुलावरील वाहतूक बंद झाल्यानंतर १९१, १५२, २६४, १५२ या क्रमांकाच्या बस पुणे स्टेशन, नागपूर चाळ, विश्रांतवाडीपर्यंत जातील. हडपसर येथून सोडण्यात येणाऱ्या ७३, १९७, २०२ या क्रमांकाच्या बस दुपारी तीननंतर शंकरशेठ रस्ता, स्वारगेट, लोकमान्यनगर, म्हात्रे पूल, कर्वे रस्त्यामार्गे वळविण्यात येणार आहेत. डेक्कन जिमखाना येथून सोडण्यात येणाऱ्या बसची वाहतूक खंडुजीबाबा चौकापासून सुरू होईल. पुणे स्टेशन येथून दुपारनंतर मध्यवस्तीतून जाणाऱ्या बस सांयकाळी सहानंतर कॅन्टोन्मेंट, स्वारगेटमार्गे जातील. कोथरूड येथून क्रमांक १४४, १०२ या बस कर्वे रस्ता, कर्नाटक हायस्कूल, भांडारकर रस्ता, गोखले चौक, फर्ग्युसन रस्ता, म्हसोबा गेट, सिमला ऑफीस, संगम पूलमार्गे पुणे स्टेशन येथे जाईल. १०३, २७८ या क्रमांकाच्या बस या नळस्टॉप, म्हात्रेपूल, स्वारगेट तर काही बस नळ स्टॉप, भांडारकर रस्ता मार्गाने जातील. शनिपार येथून सुटणाऱ्या क्रमांक ५५, ५६ या बस दत्तवाडी, अलका चित्रपटगृह मार्गे चालू राहतील. ५८, ५९ या मार्गावरील बस गुडलक चौक ते गोखलेनगर, जनवाडीपर्यंत जातील. बस क्रमांक २५, ४१, ६० या स्वारगेट, सारसबाग, म्हात्रे पूल, कर्वे रस्त्यामार्गे पुढे जातील. क्रमांक ३५०, २६२, ३२९ या बसच्या मार्गातही बदल केले जाणार आहेत.

In : News