पालखीच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सजली
Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 22, 2011
Under: News
पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवारी (ता. २३) शहरात आगमन होत असून वैष्णवांच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज झाली आहे. भक्तिशक्ती चौक, आकुर्डी व संत तुकारामनगर येथील पालखी तळ, एच. ए. मैदानावरील गोल रिंगण ठिकाण आणि शहरातील पालखी विश्रांती स्थळांची महापौर योगेश बहल यांनी मंगळवारी पाहणी करून महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
संत तुकाराम महाराज पालखीचे गुरुवारी शहरात आगमन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालखीच्या स्वागतासाठी निगडीतील भक्तिशक्ती चौकात पालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. तेथून पालखी टिळक चौक, दत्तनगरमार्गे आकुर्डी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुक्कामी पोचणार आहे. शुक्रवारी पालखीचा मुक्काम पिंपरीतील संत तुकारामनगरमध्ये संत तुकाराम महाराज मंदिरात राहणार आहे.
दरम्यानच्या वाटचालीत चिंचवड स्टेशन, पिंपरी चौक व एच. ए. कॉलनीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पालखी विश्रांतीसाठी थांबणार आहे. तसेच एच. ए. कंपनी मैदानावर पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण शुक्रवारी होणार आहे. या सर्व ठिकाणांची महापौर योगेश बहल यांनी मंगळवारी पाहणी केली. नगरसेवक यशवंत भोसले, अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम, सहायक आयुक्त अजीज कारचे, प्रशासन अधिकारी बाळासाहेब पवार, सहशहर अभियंता महावीर कांबळे, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, मकरंद निकम, रामदास जाधव, गोपाळ चिंचवडे, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड त्यांच्या समवेत होते. भक्तिशक्ती चौकातील स्वागत कक्ष उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पालखी रथातील पादुकांचे भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी पोलिसांच्या जोडीला पालिकेचे सुरक्षारक्षक येथे तैनात करण्यात येणार आहेत.
पालखीमार्गावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजीही करण्यात आली आहे. आकुर्डी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पालखीचा मुक्काम राहणार असल्याने मंदिराची रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. सुरक्षिततेसाठी प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर यंत्र बसविण्यात येणार आहे. मंदिराबाहेर पालखी तळ उभारला असून, विद्युतरोषणाईने मंदिर सजविण्यात आले आहे. देहू संस्थानचे अध्यक्ष व पालखी सोहळा प्रमुखांचा कक्ष उभारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. एच. ए. कॉलनीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पालखी दोन तास विश्रांतीसाठी थांबणार असून, संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी पोचणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही मंदिराच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे. परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.
पालखी तळ व गोल रिंगण सोहळा ठिकाणांची मंगळवारी सायंकाळी पालखी सोहळा प्रमुख बाळासाहेब मोरे, संजय मोरे, नितीन मोरे, रामभाऊ मोरे, पोलिस उपायुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त सुधीर चौगुले, पोलिस निरीक्षक तुकाराम गौड यांनी पाहणी केली.

In : News