पालखी सोहळ्यासाठी वरवंड सज्ज
Posted by सकाळ वृत्तसेवा on Monday, June 27, 2011
Under: News
तुकाराम महाराजांची पालखी उद्या दाखल होणार;
ग्रामपंचायतीकडून साफसफाई
वरवंड - जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी वरवंड (ता. दौंड) ग्रामपंचायत सज्ज झाली असल्याची माहिती सरपंच रामदास दिवेकर यांनी दिली आहे.
पालखी सोहळा बुधवारी (ता. २९) वरवंड येथील नवीन विठ्ठल मंदिरात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने अंतर्गत पालखी मार्गावर तसेच मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने मांजराई (चौफुला) ते रोटीपर्यंतच्या पालखी मार्गावरील असणाऱ्या सर्व हॉटेल व ढाब्यांची तपासणी करण्यात आली. गावाला पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाण्याची तपासणी करण्यात आली असून त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील गटारांची स्वच्छता करण्यात आली असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. पालखी मुक्काम असणाऱ्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बांधकाम विभागाकडून पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून वीज वितरण विभागाने विजेच्या लोंबणाऱ्या तारा व खांबाची दुरुस्ती केली आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांसाठी जेवणाचे नियोजन करण्यात येणार असून रात्रीच्या विसाव्यासाठी परिसरातील शाळा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने ठिकठिकाणी फिरती आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची सोय करण्यात आली आहे. विहिरीतील पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी फिरती शौचालये ठेवण्यात येणार आहेत.
वाहतुकीत बदल
पालखी सोहळ्यामुळे बुधवारी सोलापूर बाजूकडून पुण्याकडे जाणारी वाहने दुपारपर्यंतच चौफुला-केडगाव-न्हावरामार्गे नगररस्त्यावरून पुण्याला जातील, तर दुपारनंतर ही वाहतूक बंद करून कुरकुंभ-दौंड रस्त्यावरून नगरमार्गे पुण्याला वळविण्यात येणार आहे. रात्री नऊपर्यंत या मार्गे वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री. औताडे यांनी दिली.

In : News