पालखी असते एक गजबजलेलं गाव...
Posted by अजित बिराजदार : सकाळ वृत्तसेवा on Wednesday, July 6, 2011
Under: News
अकलूज (पालखीमार्गावरून) - जत्रा पांगते... पालं
उठतात..कोरड्या जमिनीत उमाळे दाटतात... ही उक्ती पालखी मार्गावर मुक्कामाच्या
ठिकाणी सर्रास अनुभवास येते आहे. शेकडो मैलावरून गेल्या पंधरा दिवसांपासून चालत
येणाऱ्या वारकऱ्यांना लागणाऱ्या वस्तूंची विक्री करणारे अनेक दुकानेही त्यांना सोबत
करीत असतात. वारकऱ्यांचा मुक्काम उठताच दुकानांची जागाही बदलते. पुढील मुक्कामाच्या
जागी दुकानेही स्थलांतरित होतात.
दाटलेल्या उमाळ्याची भावना मनात घेऊन वारकरी नव्या मुक्कामासाठी मार्गस्त होत असतात. अशा पालखी सोहळ्यातल्या गजबजलेल्या गावाची रेलचेल पंढरीच्या वाटेवर सध्या दिसत आहे. सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी लाखो भाविक पालखी मार्गावर चालत आहेत. या भक्तिमार्गावरील नव्या गावाची नवी नवलाई समोर येत आहे.
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
आणिक दर्शन विठोबाचे
हेचि मज घडो जन्मो जन्मांतरी
मागणे श्रीहरी नाही दुजे...
या संतोक्तीप्रमाणे सावळ्या विठुरायाचे दर्शन अवघ्या पन्नास किलोमीटरवर राहिल्याने वारकऱ्यांच्या भावना उत्कट झाल्या आहेत. बळीराजा असणाऱ्या वारकऱ्यांचा पावसाच्या हजेरीने आनंद द्विगुणित झाला आहे. शेकडो मैलावरून मजल दरमजल करीत निघालेला भाविकांचा जथ्या मुक्कामाच्या गावी विसावताच सुरू होते पालखीतल्या गावाची गजबज.
आई-बाप सोडून या पालखीतल्या तात्पुरत्या गावात सर्व काही मिळते बाबा...असे अंबाजोगाईहून आलेले वसंतराव काकडे यांनी सांगितले. ते म्हणाले, की दैनंदिन नित्यक्रमासाठी आवश्यक असणारे साबण, तेल, पावडर, कंगवापासून आरसा, पिण्याच्या पाण्याची बाटली, इतकेच नव्हे तर हॉटेलही या पालख्यांसोबतच असतात. दराची चौकशी करण्यासाठी वारकऱ्यांकडे वेळ नसतो, चढा दर असला तरी विठ्ठलकृपेने या वस्तू मिळतात, वेळ भागते एवढेच पाहायचे असते. वारकरी गाऱ्हाणं मांडत नाहीत कधी.
दिंडीमालकाला गावातून निघतानाच ७०० रुपये प्रति वारकरी दिले जातात. मग संख्येनुसार ट्रक किंवा टेम्पो ठरवून "रजिस्ट्रेशन' केलेल्या वारकऱ्यांचा जथ्था निघतो. दिंडीचालकावर चहा, जेवण व निवाऱ्यांची सोय करणे ही जबाबदारी असते, असे श्री. काकडे म्हणाले. इतर वैयक्तिक वस्तूंची गरज स्वत:च भागवावी लागते.
दाढी, कटिंगसाठी रस्त्याच्या कडेला रिकाम्या बारदान्यावर दुकाने थाटली जातात. दाढी १० तर कटिंग २० रुपये असा दर आहे. चहा चार ते पाच रुपयांना, छोटा साबण पाच रुपयांना मिळतो. दिंडीतील हॉटेल छोट्या टेम्पोसारख्या वाहनातून सेवा देतात. खाद्यपदार्थांचे दर पाच रुपयांना चहा तर दहा रुपयांना नाष्टा असा आहे. ही लगबग मुक्कामाच्या जागी दिसून येते. सकाळी नव्या मुक्कामाच्या दिशेने निघालेली काही पावले जुन्या मुक्कामाच्या जागी क्षणभरासाठी रेंगाळतात खरी, मात्र खरी ओढ असते विठुरायाच्या दर्शनाची. मग मुखाने हरिनामाचा गजर करीत पावले चालत राहतात. एकूण काय, वारकऱ्यांचा अख्खा गाव संगतीने चालत असतो, जणू भक्तिमार्गावरचा रस्ता हेच एक गाव बनते.
वारकऱ्यांच्या मुखात मात्र शब्द असतात...
दळिता कांडिता तुज गाईन अनंता
न विसंबे क्षणभरी, तुझे नाम गा मुरारी
नित्य हाचि कारभार मुखी हरी निरंतर...

In : News