Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 29, 2011
Under: News
पाट - संत तुकाराम
महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्यात आगमन झाले आहे. या
पालखीबरोबर येणाऱ्या हजारो वारकरी भाविक व भक्तांना चौफुला येथे दौंड तालुका श्रमिक
पत्रकार संघाच्या वतीने सुमारे दोन हजार गुडदाणी फराळाचे मोफत वाटप करण्यात आले.
संत तुकाराम महाराज यांची पालखीचे ता. २९ रोजी यवत येथील मुक्कामानंतर पालखीचे
पंढरीकडे प्रस्थान झाले. या पालखीबरोबर येणाऱ्या भाविक व भक्तांची सेवा करण्यासाठी
सामाजिक बांधिलकी जोपासत दौंड तालुका पत्रकार संघाच्या वतीने चौफुला येथे सुमारे
दोन हजार गुडदाणी फराळाचे मोफत वाटप करण्यात आले. हजारो वारकरी भक्तांनी या फराळाचा
लाभ घेतला. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष एम. जी. शेलार, सचिव सावता नवले, संघाचे
माजी अध्यक्ष मनोहर बोडखे, उपाध्यक्ष विजय चव्हाण, रमेश वत्रे, राजेंद्र झेंडे,
राजू जगदाळे, अमर परदेशी आदी उपस्थित होते.
In : News