Posted by हनुमंत शिंदे- सकाळ वृत्तसेवा on Saturday, July 9, 2011
Under: News
कासेगाव - आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना जिल्हा दूध संघाच्या वतीने जादा स्टॉल उभारून
दूध पुरविले जाणार आहे. वारीमध्ये अडीच ते तीन लाख लिटर दुधाची उलाढाल होईल, अशी
माहिती विपणन अधिकारी सुहास गडदे यांनी "सकाळ'ला दिली.
यात्रेच्या नियोजनासाठी
बार्शी, टेंभुर्णी, सोलापूर येथील जादा १०० कर्मचारी मागवून शिवाजी चौक दोन, अर्बन
बॅंक एक तर इसबावी येथे चार स्टॉल उभारण्यात आले आहे. शहरातील ३५ एजन्सीद्वारे
किरकोळ विक्रेत्यांना दुधाच्या पिशव्या तसेच पेढे पुरविण्यात येणार आहेत. यंदा
आषाढी वारीमध्ये अडीच ते तीन लाख सुट्या व पिशवीतील दुधाची विक्री होणार आहे. ९ हजार किलो पेढ्याची विक्री होईल. तूप, श्रीखंड, आम्रखंड आदी मागणीनुसार पुरविले
जाणार असल्याचेही श्री. गडदे यांनी सांगितले.
In : News