अडीच लाख भाविक पंढरीत दाखल
Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, July 6, 2011
Under: News
मंदिर समितीचे ८ लाख लाडू बनविण्याचे काम युद्ध
पातळीवर !
पंढरपूर - आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात सुमारे अडीच लाख भाविक दाखल झाले आहेत. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली आहे. आषाढीची जय्यत तयारी सुरु आहे. मंदिर समितीचे 8 लाख बुंदीचे लाडू बनविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे. सदाशिवनगर येथील पालखी सोहळ्यातील महत्त्वाचे रिंगण रद्द करण्यात आल्यामुळे, हजारो भाविकांची निराशा झाली. दरम्यान, आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगणाने लाखो भाविकांना मंत्रमुग्ध केले. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज (बुधवार) सोलापूर जिल्ह्यात थाटात आगमन झाले.
सराटी फाटा येथे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात दाखल झाला. तुताऱ्यांची गगनभेदी आणि टाळ मृदुंगांचा गजर करत, सराटी फाट्यावरून नदी पार करून सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जिल्ह्याच्या वतीने पालखीचे स्वागत केले. या प्रसंगी आमदार हणुमंत डोळस, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बळीराम काका साठे, राज्याच्या पाणी पुुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव धीरजकुमार, जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख राजेश प्रधान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव हरीदास, स्वच्छता विभागाचे समन्वयक रामदास धुमाळे, समन्वयक गणेश खेडकर उपस्थित होते.
तुकारोबारायांचा पालखी सोहळा सदाशिवराव माने महाविद्यालयाच्या पटांगणात दाखल झाला. त्यानंतर गोल रिंगण लावण्यात आले. अश्वाने चौफेर उधळण करीत ऐटदारपणे चालत गर्दीमधून धूम ठोकली. क्षणार्धात गोलाकार वेढे घेत गोल रिंगण पूर्ण केले. घोड्याच्या पायाला लागलेली धूळ मस्तकी लावण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. कुणी घोड्याच्या अंगावर खारीक-खोबरे उधळण्यात दंग होते.
पंढरीत भाविकांचा ओघ सुरूच
पंढरपुरात रेल्वे आणि एसटी बसने बुधवारी एक लाखापेक्षा अधिक भाविक दाखल झाले आहेत. शहरात आतापर्यंत अडीच ते तीन लाख भाविक आल्याचे शहर प्रशासनाने सांगितले. दर्शन बारीत सहभागी होण्यासाठी त्यांनी रांग लावण्यास सुरवात केली आहे. संतांच्या सर्व पालख्यांचे जिल्ह्यात आगमन झाल्यामुळे, पंढरपुराकडे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. भाविक मोठ्या प्रमाणावर पालखी सोहळ्यातून पंढरीत येऊन परत पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जात आहेत.
पावसामुळे रांगेतील भाविकांचे हाल
पावसामुळे दर्शन रांगेतील भाविकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या दर्शन रांगेचा फटका हजारो भाविकांना बसला. पावसामुळे भाविकांची ना घर का ना घाटका, अशी स्थिती झाली. परंतु मनात दर्शनाची ओढ कायम असल्यामुळे भाविकांना दर्शन रांग सोडली नाही.
८ लाख बुंदीचे लाडू..!
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने 8 लाख बुंदीचे लाडू तयार करण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम सुरू केली आहे. भक्त निवासातील मुदपाकखान्यात लाडू बनविण्याचे काम सुरू आहे. दहा रुपयांना दोन लाडू, या प्रमाणे ना नफा ना तोटा या धर्तीवर विक्री चालू झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यापासून, प्रशासन गतिमान झाले आहे. डॉ. पाटील यांनी "व्हीआयपी' दर्शनावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे मधून दर्शन घेणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.
अत्याधुनिक मोबाईल टॉयलेट
पालखी सोहळ्यासमवेत पुणे विभागाय आयुक्त कार्यालयाने बनविलेली दोन "मोबाईल टॉयलेट' भाविकांच्या सेवेत दाखल झाली आहेत. या "मोबाईल टॉयलेट'मुळे भाविकांची चांगली सोय झाली आहे. सोबत पाण्याचा टॅंकर देण्यात आल्यामुळे, कुठेही अडचण निर्माण होणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

In : News